अध्यक्ष खंडू बनसोडे तर कार्याध्यक्ष सागर डोलारे यांची निवड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती २४-२५ बैठक

सोलापूर : प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती सोलापूर पदाधिकारी निवड व जयंती कार्यक्रम नियोजन वार्षिक बैठक घेण्यात आली. प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, मातंग समाज अध्यक्ष सुहास शिंदे, विद्याधर पोटफोडे, सुरेश पाटोळे, समाधान आवळे, मुकुंद शिंदे, श्रीकांत देढे, राजू शिरसागर, आबा लोंढे, श्रीकांत बोराडे यांच्यासह समाजातील जेष्ठ युवक उपस्थित होते.
यावेळी सर्वानुमते खंडू बनसोडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी समाजातील जेष्ठ, युवक यांनी समाजातील प्रश्न, मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणारे कार्यक्रम, युवकांचे प्रश्न, मिरवणूक मार्गातील अडथळे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी विनोद लोंढे, मल्लिकार्जुन कांबळे, विवेक डोलारे, साक्षांत लोखंडे, बंडू गवळी, सोहन लोंढे, गुड्डू शिंदे, रोहित खिलारे, रवी ढोबळे, तुषार खंदारे, सुधाकर पाटोळे, महेश लोंढे, शैलेश पोटफोडे, यांच्यासह समाजातील जेष्ठ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततेत पार पाडण्याचा एकमुखी ठराव बैठकीत घेण्यात आला.