हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीच्या फोटोला केली पायपुसणी, हिंदू महासभेने नोंदवला निषेध
हिंदू धर्माची जाहिर माफी मागा, अन्यथा तोंडाला काळे फासू : सुधीर बहिरवाडे

सोलापूर : प्रतिनिधी
संसदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक म्हणून संबोधले याचा सबंध भारतात निषेध नोंदवला जात आहे. सोलापुरात देखील हिंदू महासभेच्या वतीने त्यांच्या अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत शासन, प्रशासन आणि हिंदू द्वेषांचे लक्ष वेधले.
सोलापूर तीन मारुती मंदिरात शनिवारी मोठी गर्दी असल्यामुळे तेथे मंदिरात राहुल गांधीच्या फोटोला पायपुसणी करून त्यावरून लोक चालत जाऊन निषेध व्यक्त करत होते. तसेच काळजापूर मारुती, शनी मंदिर व तुळजापूर वेस येथील मारुती मंदिर अशा तीन मंदिराच्या समोर राहुल गांधीच्या फोटोचे पाय पुसणी करून निषेध करण्यात आला.
त्यावेळी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे म्हणले, आज राहुल गांधीचे आजोबा फिरोज खान होते मग राहुल गांधी हा हिंदू कसा होतो. त्यासाठी राहुल गांधीने गांधी आडनाव सोडून मूळ नाव राहुल खान लावावे, हा स्वतः एक मुसलमान असल्यामुळे तो हिंदूंचा देव्ष करणारच. त्यासाठी तो कधी सुद्धा, ज्याने काश्मीरमध्ये हिसा पसरवली भारतात दहशतवादी केले त्या धर्माबद्दल तो कधीच बोलत नाही पण हिंदू हा सहिष्णू असून सुद्धा त्याच्या विरोधात तो सदैव बोलत असतो. त्यामुळे यापुढे जर तो हिंदूंच्या विरोधात काय बोलला तर आम्ही त्याच्या तोंडाला जिथं आहे तिथे जाऊन काळे फसवू अशा इशारा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवराज गायकवाड म्हटले की, जर राहुल गांधी हा आमच्या हिंदूंना हिंसक म्हणतो एक दिवस त्याची जरा सुरक्षा हटवा आम्ही त्याचे काय हाल करू मग हिंदू हिंसक आहे का अहिंसक आहे हे त्यावेळी त्याला दाखवण्यात येईल. याने तत्काळ मध्ये संपूर्ण हिंदू धर्माची माफी मागावी अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी हिंदुमहासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, शिवराज गायकवाड, सिद्धेश्वर पाटील, प्रसाद झेंडगे, शुभम कराळे, श्री चव्हाण, विशाल पवार, राहुल दहीहंडे, सुरज खैरे, सुरज भोसले, सतीश आनंदकर, लतेश हिरवे आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.