जबर मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

सोलापूर : प्रतिनिधी
यात हकीकत अशी की, फिर्यादी व तिचे पती जुना कारंबा नाका येथील स्मशानभूमी जवळ त्यांची गुरे चरायला गेले असता, यातील आरोपी आकाश प्रकाश कुचेकर, दिपक गायकवाड, व इतर 6 आरोपींनी फिर्यादी व त्यांचे पतीस येथे गुरे चरायला आणायची नाहीत म्हणुन काठीने व दगडाने जबर मारहाण करून जखमी केले होते.
तेव्हा फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे भा.द.वी. कलम भा.द.वी.कलम 143, 147, 149, 326, 324, 504 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे ॲड. विशाल मस्के यांनी वकीलपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले.
यात आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती मर्ढेकर यांनी आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यात आरोपी तर्फे ॲड. विशाल मस्के, ॲड. स्वाती मस्के यांनी काम पाहिले.