अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांनी संघटन बांधणीत घातले लक्ष, कागदावर नाही तर प्रत्यक्ष कामास पवन पाटिल यांची सुरुवात
महाविद्यालय तेथे शाखा, राष्ट्रवादी विद्यार्थ्यी काँग्रेसच्या अभियानाची सुरुवात

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, रा. वि. काँ. प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या संकल्पनेतून सबंध महाराष्ट्रभर महाविद्यालय तेथे शाखा अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात वालचंद महाविद्यालय येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
शाखेचे उद्घाटन शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उदघाटन उपक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यी संघटनेचे शहर अध्यक्ष पवन पाटील यांनी केले होते. शाखा अध्यक्ष नागेश हाडलगे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, तुषार जक्का, अशितोष नाटकर, दत्ता बडगंची, इरफान शेख, विद्यार्थ्यी अध्यक्ष पवन पाटील, प्रिया पवार, कांचन पवार, शाखा अध्यक्ष नागेश हाड़लगे, आयान शेख, राम भोगे, विकी धाकपाडे,
दीपक हिप्परगे, विठ्ठल येरझल, संतोष माने, बिपिन घोडके, रितेश चौगुले, तम्मा डाबरे, वरुण कोतम, साहिल तंबोली, मलिकार्जुन अगड़ी, अविनाश हजारे, विशाल अगड़ी, अक्षय जाधव, बालू घंटे आदि पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.