‘चरण सेवा’ देत 4 हजार वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, 80 डॉक्टर सहभागी, कोण कुठले आहेत डॉक्टर.?

सोलापूर : प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर व असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी वारी निमित्त माळशिरस येथे वारीमध्ये सहभागी झालेल्या जवळपास 4 हजार वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व वारी मधील वारकऱ्यांना ‘चरण सेवा’ देखील देण्यात आली.
या आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथील 80 डॉक्टर सहभागी होते. अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या या मोफत सेवे बद्दल कौतुक करत आभारी व्यक्त केले.
वारकऱ्यांची सेवा केल्याने रोजच्या दैनंदिन डॉक्टरकीच्या कामापेक्षा एक वेगळा आनंद मिळाला. वारकऱ्यांमध्ये खऱ्या अर्थाने प्रामाणिकता, मनमोकळेपणा आणि विठ्ठल भेटीची आस दिसून आल्याचे मत काही डॉक्टरांनी व्यक्त केलं.
या शिबिराचे प्रमुख डॉ.अनिकेत ताटे यांच्या सहित डॉ.शिवशंकर नाईकवाडी, डॉ.रोहित माळकर, डॉ.विशाल नारायणकर, डॉ.त्रिवेणी शिंदे, डॉ.अंकिता नागवडे, डॉ.अक्षता तेली, डॉ.तेजस हाडस, डॉ.संकेत निंबाळकर, डॉ.नेहा फेरे, डॉ.अदिती राव, डॉ.सुचित्रा चव्हाण, डॉ.सृष्टी मगर, डॉ.यश जानराव आदी डॉक्टरांनी सेवा केली.