सोलापूरराजकीय

केजरीवालांना जामीन मिळाल्याने आपचा सोलापुरात जल्लोष, फटाके फोडून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना भरवली मिठाई

आमचा वाघ बाहेर आलाय आता जनता या तानाशाही प्रवृतीचा बदला मतदानातून घेईल : श्रीकांत वाघमारे (शहर उपाध्यक्ष,आप)

सोलापूर : प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 10 मे रोजी सर्वोच न्यायालयाने अंतरीम जामीन दिला आहे. त्यानिमित्त सोलपूरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगत सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

त्यांनतर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि मग फटाके फोडून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवले. आणि परिसरातील सर्व नागरिकांना देखील मिठाई देण्यात आले.

अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी सक्त वसुली संचालानालयाने अटक केली होती. या अटकेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये आम आदमी पक्षाने काढलेल्या मोर्चाप्रकरणी पोलिसा समवेत बरीच झटापट झाली होती. मात्र आता केजरीवालांना जामीन मिळाल्याने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच हुकूमशाहीच्या विरोधातील ही लडाई आणखीन तीव्र करू आणि देशाचे सरंक्षण करू. आमचा वाघ बाहेर आलाय आता जनता या तानाशाही प्रवृतीचा बदला मतदानातून घेईल. असे मत आप सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी मांडले.

यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, युवाध्यक्ष निलेश संगेपाग, शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, संघटक जुबेर हिरापुरे, जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, संघटक मेहमूद गब्बूरे, संघटक आनंद जाधव, संघटक विनायक पवार, श्रमिक संघटन अशोक होटकर, मीडिया संयोजक अनिल वाले, पालक युनियन रोबर्ट गौडर, मदणी चाचा, विध्यार्थी आघाडी झिहान बागवान यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!