दिलीप भाऊंना पाहताच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची थांबली गाडी, भाऊंनी सत्कार करत शिबिराची दिली माहिती

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी आले होते. सोलापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी पंढरपूर कडे मार्गस्थ होताना मरीआई चौक येथे शिवसेना शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख जयश्री पवार, महिला आघाडी मागासवर्गीय शहर प्रमुख माधुरी कांबळे, आरोग्य विभागाचे समन्वयक जवाहर जाजू, मंगेश डोंगरे, बाळासाहेब सुरवसे, आकाश जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिलीपभाऊ यांना वारीनंतर मुंबईला येण्याचं निमंत्रण दिले.
यासह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना याचे मोफत शिबिर मिल कामगार चाळ येथे शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या वतीने घेण्यात आले.
या योजनेसाठी मोफत ऑनलाईन फॉर्म भरून देणे, आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे, कागदपत्र उपलब्ध करून देणे यासह सर्व मदतीची व्यवस्था शिबिरा ठिकाणी करण्यात आली होती.
दोन्ही योजनेसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी देखील करण्यात आली. याची माहिती ही खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरीफ निगेबान, रोहन उडानशिवे, राहुल काटे, वंदना जाधव, सुरेखा चटके, गौरव चव्हाण, मुबिना शेख, कविता चव्हाण, रणजित कोल्हे, पार्थ कोल्हे, हर्ष कोल्हे, यांच्यासह जय महाराष्ट्र तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.