सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक

गुरुपौर्णिमा निमित्त श्रीगुरुदेव श्रीनिवासजीं दर्शन सोहळा, कधी कोठे कसा.?

सोलापूर : प्रतिनिधी

सनातन धर्मनिष्ठ, सश्रद्ध-भाविक, पारमार्थिक जिज्ञासू, सद्गुरुभक्त व तसेच श्रीविद्या अखंड महायोग परंपरास्थ साधक-साधिकांना आनंदाची माहिती की, यावर्षी अर्थात २०२४ मध्ये भगवान वेदव्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा रविवार दिनांक २१ जुलै रोजी संपन्न होत आहे.

सदरहू गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजी जिज्ञासू, साधक आणि भाविक भक्तांना दर्शन देत असतात. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने संपन्न होणारा परमपूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन सोहळा रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत श्रीविद्या अखंडमहायोग अभ्यास केंद्र, चंद्रलोक नगर, इंडियन मॉडेल स्कुलजवळ, जुळे सोलापूर येथे संपन्न होणार आहे. त्यादिवशी इच्छुक भाविकभक्त आणि साधकांना पूज्य श्रीगुरुदेव श्री निवासजींचे दर्शन सकाळी ८ ते दुपारी १ या कालावधीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दर्शन घेता येईल.

पूज्य श्रीगुरुदेवांच्या दर्शनाची वेळ सकाळच्या सत्रात अर्थात ८ ते १ यावेळेत नियोजित केलेली असल्याने इच्छुक दर्शनार्थी भाविकभक्तांनी निर्दिष्ट केलेल्या वेळेतच पूज्य श्रीगुरुदेवांचे दर्शन घ्यावे. गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर पूज्य श्रीगुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी दर्शनेच्छुक भाविकभक्तांनी श्रीमान साधक दिनेश साने ( ९८८१४०३५६३ ), श्रीमान साधक सतीश बिटला ( ९८८१०५३४६३), श्रीमन साधक अनिल जाधव ( ९४०३०४६०२९ ) आणि श्रीमान साधक गिरीश कोनाळे ( ७३५०२२९९५१) यांच्याशी फोनद्वारे संपर्क करावा आणि दर्शनासाठी नोंदणी करावी असे आवाहन श्रीविद्या अखंडमहायोग सत्संग सभेच्या वतीने करण्यात येत आहे.

या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूज्य श्रीगुरुदेव श्रीनिवासजीलिखित `गीतार्थ संजीवनी’ नामक श्रीमद्भग्वद्गीतेच्या नवव्या अध्यायावरील टीका व तसेच `श्रीविघ्नेश्वर विनायकगणेश यंत्ररहस्यप्रकाश’ हे दोन नूतन ग्रंथ प्रकाशित होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!