सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रसामाजिक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून श्री विठ्ठल रुक्मिणी साठी खास पोशाख

सोलापूर : प्रतिनिधी (पंढरपूर)
महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाकडून खास पोशाख आणण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सून आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांनी स्वतः श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे येऊन हा पोशाख सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे दिला आहे.
अत्यंत सुंदर असा हा पोशाख आषाढी एकादशी शासकीय महापूजा वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी याना परिधान केला जाईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.