“शास्त्रीनगर में पानी का मसला हुआ हल” लोगोने खासदार प्रणिती और वाहीद भाई को दिये दुवाये.

सोलापूर : प्रतिनिधी
शास्त्रीनगर परिसरातील हॉलीबॉल ग्राऊंड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचे समस्या निर्माण होऊ लागल्याने तेथील नागरिकांनी वारंवार सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना या संदर्भात सांगितले होते. संबंधित अधिकारी हे आपल्या परिसरात चार इंची पाईपलाईन असून त्यामुळे हे समस्या उद्भवत असून या ठिकाणी सहा इंच पिण्याचे पाईपलाईनचे नियोजन करावा लागेल असे सांगितले.
दरम्यान संबंधित शास्त्रीनगर येथील नागरिकांनी या समस्या घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांचे निष्ठावंत तथा सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक अध्यक्ष वाहीद बिजापुरे यांना भेटून सदरील समस्या बाबत कल्पना दिले. वाहिद बिजापुरे हे व शास्त्रीनगर परिसरातील नागरिक तत्कालीन आमदार आजचे खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यास सुरुवात केले.
अखेर खासदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून शास्त्रीनगर परिसरातील हॉलीबॉल ग्राऊंड सादिक किराणा दुकान ते पत्ते वाले खाला यांच्या घरापर्यंत एकूण पाच लाख तीस हजार 80 रुपयाचे पिण्याचे सहा इंच पाईपलाईन हे मंजूर झाले व त्याची सुरुवात आज शास्त्रीनगर परिसरातील नागरिक व तसेच काँग्रेसचे निष्ठावंत वाहिद बीजापुरे यांच्या उपस्थितीत फात्या खानी करत श्रीफळ फोडून सदर कामाची सुरुवात करण्यात आले.
यावेळी शास्त्रीनगर परिसरातील शकीला शेख, रशिदा नदाफ, रेहान नदाफ, शमो गिरगावकर, शबाना चाबुकस्वार, फरीदा शेख, दौवला नदाफ, इब्राहिम गिरगावकर, सिद्दीक गिरगावकर, इमरान मणियार, यांसह परिसरातील बहुतांशी नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे व तसेच सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांचे आभार व्यक्त केले.