सर्वपक्षीय आमदार खासदार पालकमंत्री यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही : सकल मराठा समाजाचा इशारा

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा सामाज संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा सामाज्याला OBC मधून आरक्षण मिळावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करणे व हैद्राबाद गॅजेट ची पूर्तता करून लागू करणे ह्या मागणीसाठी गेली ६ दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. परंतु शासनाने अद्याप याची दखल घेतलेली दिसत नाही. जरांगे पाटील यांनी ह्याच मागणी साठी अनेकवेळा उपोषण केलेले आहे तसेच मागील ६ दिवसापासून उपोषण चालू असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची परिस्थिती आहे, सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आपणास गंभीर इशारा देण्यात येत आहे कि जर जरांगे पाटील याना काहीही बरेवाईट झाल्यास संपूर्ण मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्तावर उतरेल आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये जाम केली जातील यातून कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे याची नोंद घ्यावी.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज्याचा ४२ वर्षाचा लढा अंतिम टप्यात आणला आहे तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन सर्व मागण्या मान्य करून उपोषण तात्काळ सोडवण्याचे काम करावे अन्यथा महाराष्ट्रातील कोट्यावधीचा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही व हे ह्या महाराष्ट्राला ह्या सरकारला परवडणारे नसेल असा गंभीर इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी पुरुषोत्तम बरडे, राजन जाधव, जयकुमार माने, विनोद भोसले, महादेव गवळी, औदुंबर जगताप, नागेश तकमोगे माऊली पवार, आप्पासाहेब सपाटे, लहू गायकवाड, विलास लोकरे, प्रकाश डांगे, प्रशांत देशमुख, आबा सावंत, मनिषा नलावडे, संजीवनी मुळे, निर्मलाताई शेळवणे, मनीषा नलावडे, यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.