सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज, ठिक ठिकाणी स्वागत कमानी, भगव्या झेंड्याने वातावरण झाले भगवामय

मराठ्यांचे वादळ सिद्धरामेश्वर यांच्या नगरीत एकवाटणार

सोलापूर : प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सोलापूर नगरी सज्ज झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य गोलाकार पद्धतीचे व्यासपीठ उभारले आहे. शहरात ठीक ठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर आणि स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत. शहर जणू काही भगवमय झाले आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून मराठ्यांचे लाखोचे भगवे वादळ सिद्धरामेश्वराच्या पावन भूमीमध्ये एकवटणार आहे.

मराठा व कुणबी एकच सगे सोयरे करावा या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन अंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापुरातून होणार असून या शांतता रॅलीसाठी जरांगे पाटील यांचे दुपारी बारा वाजता येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात आगमन होणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर तेथून ते रॅलीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर तेथेच उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठा वरून ते मराठा समाज बांधवांना संबोधीत करणार आहेत. या शांतता याञेची तयारी संपूर्ण पूर्ण झाली असून शहरात ठीक ठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत कमाणी उभारण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक ते डाॕ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत जरांगे पाटलांच्या स्वागताचे डिजिटल बॅनर मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने झळकत आहेत.

शांतता रॅलीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक बाळवेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मार्ग बारा तास वाहातुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे .त्यामुळे शहरातील वाहतुक इतरत्र वळवण्यात आले असली तरी या शांतता यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या अधिकारात शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून तसे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत त्याबाबतचे अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत

महिलांसाठी बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा आणि शांतता यात्रेत लाखोंचा जनसमुदाय येणार आहे .यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असणार आहे .त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीच्या वतीने महिलांची विशेष काळजी घेतली गेली आहे. महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून परिसरात असलेल्या हॉटेल्स आणि काही घरांमध्ये महिलांच्या स्वच्छता गृहाची देखील सोय केली आहे तसे फलक सभेच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहे. तरी शहर जिल्हा परिसरातील समाज बांधवांनी गर्दी टाळण्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्किंग करून सभेच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला नेहमी गर्दी होते. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा निर्णायक ठरणार आहे. मराठा क्रांती मोर्चाने अतिशय सूक्ष्म नियोजन केले आहे. येणाऱ्या मराठा बांधव, भगिनींची सोय ही क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस, महापालिका प्रशासनाची मदत घेऊन काम करत आहोत. अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अमोल शिंदे, अनंत जाधव, रवी मोहिते यांनी दिली.

एक लाख लाडू बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात मराठा शांतता यात्रेत सहभागी होणाऱ्या समाज बांधवांना एक लाख बुंदीचे लाडू चे वाटप केले जाणार आहे. लाडू बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले. यासाठी गेली दोन दिवस झाले पाचशे महिला आणि पुरुष हे लाडू बनवण्याचे काम रात्रंदिवस करत आहेत एक ट्रक केळीचे वाटप चिवडा आणि लाडू सह तब्बल एक ट्रक भर केळीचे वाटप देखील स्वयंसेवकाच्या माध्यमातून केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!