रवी मोहिते यांनी जुळे सोलापूरात अखंड मराठा समाजाची केली वज्रमुठ, अंतरवली सराटी येथून येणाऱ्या 100 समन्वयकांचे केले नियोजन

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासह सगेसोयरांचा प्रश्न निकाली काढावा या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीची सुरुवात करणार आहेत. याची सुरुवात सोलापूर शहरातून होणार आहे यानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बैठका घेण्यात आल्या.
जुळे सोलापूर, मजरेवाडी, विजापूर रोड, आसरा चौक या भागात मराठा समाजाचे संघटन करत अखंड मराठा समाजाचे राज्य समन्वयक रवी मोहिते यांनी या भागात सर्वांना एकत्र करत मराठ्यांची वज्रमूठ बनवली. रवी मोहिते यांनी जुळे सोलापूर, विजापूर रोड, आसरा चौक या भागातील मराठा बांधवांच्या बैठका घेत 7 ऑगस्ट रोजी होणारी शांतता रॅली आणि सभेस येण्याचे आवाहन करत तेथील युवकांना वाहन पार्किंग, डिजिटल फ्लेक्स लावणे, माहिती पत्रक वाटणे, समाज बांधवांच्या घरोघरी जाऊन माहिती देणे, यासह करण्यात येणाऱ्या नियोजनाची जबाबदारी दिली.
7 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत अंतरवाली सराटी जालना येथून अखंड मराठा समाजाचे राज्य समन्वयक आणि मराठा बांधव येणार आहेत त्यांच्या राहण्याची, जेवणाचे नियोजन बैठक रवी मोहिते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. मयूर मंगल कार्यालयात होणाऱ्या नियोजनासाठी जुळे सोलापूर भागातील 25 युवकांची टीम त्यांनी तयार करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली.
मागील महिन्याभरा पासून मराठा क्रांती मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या वतीने 7 ऑगस्ट रोजी होणारी शांतता रॅली आणि सभेच्या नियोजनामध्ये अखंड मराठा समाजाचे राज्य समन्वयक रवी मोहिते यांनी हिरीरीने भाग घेत आपला सहभाग नोंदवला.
यावेळी अखंड मराठा समाज जुळे सोलापूर भागातील रवी भोपळे, पोपठ भोसले, महेश घाडगे, सुहास भोसले, नामदेव पवार, विकास कदम, बालाजी वाणकर, प्रशांत देशमुख, प्रमोद भोसले, श्रीहरी माने, मोहन चोपडे, स्वप्निल साळुंखे, मनीषा नलावडे, असंख्य समाज बांधव उपस्थित होते.