सोमनाथ वैद्य व युवराज राठोड यांचे दक्षिण तालुक्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका, 51 हजार बेसन लाडूं वाटून जिंकली स्वामी भक्तांनी मने, आजी-माजी आणि नविन इच्छुकांना लागली धास्ती

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निकालानंतर आगामी विधानसभेचे वेध लागले आहेत विद्यमान आमदारांसह आजी माजी आमदार आणि विविध पक्षातील इच्छुक आमदार यांनी आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
स्वयं शिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य व सोनाई फाउंडेशनचे युवराज राठोड यांच्या संयुक्त विद्यमानाने दक्षिण तालुक्यामधील विविध मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त 51 हजार लाडूचे वाटप करण्यात आले आहे.
जुळे सोलापूर मधील समर्थ नगर मधील स्वामी समर्थ मंदिर, कल्याण नगर दत्त मंदिर, सुंदरम नगर स्वामी समर्थ मंदिर, सोरेगाव गजानन महाराज मंदिर, बनशंकरी चौक, माढा बनशंकरी मंदिर, सिंधू विहार गणेश मंदिर, कमला नगर येथील हनुमान मंदिर, अलकुंटे बिल्डर यांचे श्री स्वामी समर्थ मंदिर, बिरनाळ मठ, मंद्रूप, हत्तुर, सदर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी युवराज राठोड, श्रीशैल हत्तुरे, शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख अण्णाप्पा सत्तूबर, तेरा मैलचे माजी सरपंच आनंद देशमुख, देगावचे भगवान जोशी, हत्तूरचे श्रीशैल हत्तुरे, तेलगावचे धर्मराज पुजारी, माळकवठे येथील प्रशांत काळे,
महादेव बगले, मंद्रूपचे सरपंच अनिता कोरे, अल्ताफ शेख, बेलाटी येथील बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम पाटील, पुजारी अण्णाप्पा घुटकडे , विजय वाघमोडे,उस्मान नदाफ, माळकवठेचे माजी सरपंच अमोघसिद्ध थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.