वाढदिवस अजितदादांचा सोलापूरात वातावरण झाले राष्ट्रवादीमय, संतोष पवार यांचे नेटके नियोजन तर जुबेर बागवान यांची मध्यची मोर्चे बांधणी
NCP डॉक्टर सेलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तर जिल्हास्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा संपन्न, खुल्या गटात मानस गायकवाड अजिंक्य

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील म्हाडा जुळे सोलापूर येथील लोटस क्लिनिक व आराध्या मेडिकल यांच्या सौजन्याने महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिर, औषध गोळ्या वाटप, रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, मधुमेह, मोफत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, डॉक्टर सेल चे शहर अध्यक्ष डॉ संदीप माने, कार्याध्यक्ष डॉ महेश वसगडेकर, डॉ हरिषचंद्र गलियाल, डॉ अंजली वसगडेकर, डॉ.अंबिका चव्हाण, आराध्या मेडिकल चे आकाश चाबुकस्वार, मैत्री सोशल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विनायक साळुंके, संतोष कासे, तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सरचिटणीस शामराव गांगर्डे, मनोज शैरला, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, दक्षिण विधानसभा महिला अध्यक्ष प्रिया पवार, कार्याध्यक्ष कांचन पवार, सुरेखा घाडगे आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा, खुल्या गटात मानस गायकवाड अजिंक्य
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसा निमित्त वरिष्ठ ११ व ७ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकीत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड याने स्पर्धेत सहा पैकी सहा गुण प्राप्त करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
तसेच अनुभवी विशाल पटवर्धन, मंगळवेढ्याचा स्वप्नील हदगल, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे यांनी सुरेख खेळ अनुक्रमे द्वितीय, तिसरा व चौथा क्रमांक पटकावित वरिष्ठ संघातील आपले स्थान निशित केले. श्रेयस कुदळे, नमन रंगरेज, संस्कृती जाधव, निवा बुरटे यांनी आकर्षक खेळ करत ११ व ७ वर्षाखालील गटात जेतेपद पटकाविले. तसेच ओम राऊत, विवेक स्वामी, प्रीशा भांगे व ईशा पटवर्धन यांनी देखील उत्कृष्ट खेळ करत उपविजेतेपद प्राप्त केले.
फडकुले सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठ नेते आनंद मुस्तारे, संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, सोमनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संतोष भाऊ यांनी खेळाचे महत्व विषद करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर जिल्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले. राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना रुपये हजार रुपये रक्कम देण्यात येणार असून विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक व मेडल्स मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे तर त्यांना सहाय्यक म्हणून रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे यांनी यशस्वीरीत्या काम पाहिले.