अधिवेशन पद्मशाली समाजाचं, खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपावर सडकून टीका, राजकिय भाषण झाल्याची चर्चा
हिंदू-मुस्लीम चा वाद बीजेपी ने आपल्या देशात पेटवला, जात-पात धर्मावर बीजेपी ने राजकारण केलं : खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन घेण्यात आले. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रमुख उपस्थिती खासदार प्रणिती शिंदे, यांच्यासह मुख्य आयोजक महेश कोठे, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणातून बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.. समाजाचा लोकप्रतिनिधी असेल तरच फक्त आपले प्रश्न मांडतो तो गैरसमज आहे, ज्यांच्या आशीर्वादामुळे मी विधानसभेत, लोकसभेत पोचले त्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करत राहीन अशी ग्वाही त्यांनी पद्मशाली अधिवेशन मध्ये दिली.
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन सोलापूर या अधिवेशनात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी आपल्या भाषणात बऱ्याच वेळ भाजपवर टीका केली एकंदरीतच अधिवेशन पद्मशाली समाजाचे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे भाषण भाजपवर टीकेचे हे भाषण राजकीय असल्याची चर्चा अधिवेशनात पद्मशाली बांधवात सुरू होती.
यावेळी देशभरातून, राज्यभरातून आलेले पद्मशाली समाजाचे नेते मंडळी, समाजातील जेष्ठ समाजबांधव, विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तसेच सर्वच क्षेत्रातील पद्मशाली समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.