खेकड्याच्या जातीची लोकांनी अधिवेशनाला विरोध केला परंतु समाजा मुळे पद्मशाली अधिवेशन यशस्वी झाले : महेश कोठे
पद्मशाली समाजाचा हिंदुत्वासाठी वापर केला जातो, अशा बांधवांनी आपल्या नेत्यांना विचारावे त्यांनी समाजासाठी काय केले : महेश कोठे

सोलापूर : प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन घेण्यात आले. यावेळी बोलताना आयोजक महेश कोठे म्हणाले, पद्मशाली समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सरकारकडून मनावा असा सहकार्य मिळत नाही विशेषतः आर्थिक विकास महामंडळ नसल्याने युवक आणि रोजगाराच्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्व भागातील कारखाने बँका बंद पडल्याने नवउद्योजक व्यापाऱ्यांना सावकारा कडून पैसे घ्यावे लागतात त्यातून मिळणारा नफा हा त्यांनाच जातो. उर्जित अवस्था आणण्यासाठी महामंडळाची गरज आहे. यंत्रमाग धारकांना न्याय मिळावा त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, मागील पंधरा वर्षापासून पद्मशाली समाजाचा आमदार नाही. त्यामुळे ही अधोगती होत आहे एकेकाळी पूर्व भागातून आमदार खासदार निवडले जायचे.
पद्मशाली समाज आंध्रमध्ये एसटीमध्ये आहे, मागील काळात पद्मशाली समाजाला एसटी समावेश करण्यात येणार होता परंतु काही ज्येष्ठ मंडळींनी त्याला विरोध केला. सध्या दोन टक्के आम्ही एसइबीसी मध्ये आहोत त्याला देखील कोर्टात चॅलेंज केले आहे. शासनाच्या वतीने त्याला देखील चांगला वकील दिला तर आम्हाला न्याय मिळेल. पद्मशाली समाजाच्या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनाची गरज होती. ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक समाजा मध्ये खेकड्याच्या जातीची लोक असतात त्या लोकांनी अधिवेशनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांनी खेकड्याची जात दाखवली, जोपर्यंत समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत समाजाच्या पदरात काही पडणार नाही.
समाजाने एकत्र आले पाहिजे काहींच्या विचारात अजून देखील बदल होत नाही परंतु पद्मशाली समाजातील युवकांपासून जेष्ठांपर्यंत अनेकांना वाटते आपण एक झालं पाहिजे आणि आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे आजची अधिवेशनाची गर्दी पाहता येणारा काळात समाजाला नक्की न्याय मिळेल. आम्ही धार्मिक लोक आहोत आमचा फक्त हिंदुत्वासाठी वापर केला जातो पद्मशाली समाजाचा वापर करणाऱ्यांनी समाजासाठी काय केले ते सांगावे. हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या पद्मशाली बांधवांनी आपल्या नेत्यांना विचारावे त्यांनी समाजासाठी काय केले. समाज मनापासून एकत्र आला तर नक्की फायदा होईल इतर समाजासाठी सुद्धा मी भरपूर केले असे म्हणत महेश कोठे यांनी भाजप वर निशाणा साधला…