सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

सराईत गुन्हेगार दाद्या काळे 2 वर्षासाठी तडीपार, गंभीर स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल, तडीपार केल्यानंतर कर्नाटकातील कलबुर्गी येथे सोडले

सोलापूर : प्रतिनिधी

आगामी काळात विविध जातीधर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत व इतर पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे गणेश उर्फ दाद्या इंद्रजित काळे वय-२९ वर्षे रा. पारधी कॅम्प, अश्विनी हॉस्पिटल समोर, कुंभारी, ता.द. सोलापुर जि. सोलापुर हा सदर परिसरात चोरी करणे, घरफोडी करून सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ, सोलापूर शहर यांचे आदेश पारित झाले होते. त्यास दि. २६/०७/२०२४ रोजी विजापुर नाका पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेवुन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व धाराशिव जिल्हातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर दर्गासिर पारधी कॅम्प, मादनहिप्परगा ता. आळंद जि. कलबुर्गी, राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग ०२) यशवंत गवारी, वपोनि/विजापुर नाका पोलीस ठाणे दादा गायकवाड, दुपोनि/संगीता पाटील, सपोनि/शितलकुमार गायकवाड, पोशि/१४८९ रमेश कोर्सेगांव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!