उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी मुंबईत जाऊन दिल्या शुभेच्छा.

सोलापूर : प्रतिनिधी (मुंबई)
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज 27 जुलै 2024 रोजी मातोश्री निवासस्थानी राज्य भरातील शिवसैनिकानी, विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी गर्दीचा अक्षरशः महापूर दिसून आला होता. अशा स्थितीत शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी देखील पक्षप्रमुख उध्दव ठाकरे याची खास भेट घेऊन अभिष्टचिंतन करीत शुभकामना दिल्या.
त्याच वेळी तमाम शिवसैनिकांची माय माऊली रश्मी (वहिनी) उध्दव ठाकरे यांची देखील भेट घेतली. त्याभेटीत सोलापूर शहरात भगव्या सप्ताहा निमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची त्यांना माहिती देखील दिली.
यावेळी रश्मी वहिनी यांनी अस्मिता गायकवाड यांना आपले काम जोमाने सुरू ठेवा माझ्या आपणास शुभेच्छा आहेत असे म्हणत आश्वासित केले.