सोलापूरआरोग्यमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

ॲम्बुलन्स सेवा सोलापूरकरांच्या सेवेसाठी रुजू, महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेचे सामाजिक भान

सोलापूर : प्रतिनिधी

हद्दवाढ भागातील विजापूर रोडवरील जुळे सोलापूर परिसरात कार्यरत असणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीने सोलापूरकरांच्या सेवेत ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आले आहे. या सेवेचा शुभारंभ ब्लड बँकेचे संस्थापक तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभहस्ते ॲम्बुलन्स गाडीचे पूजा, नारळ फोडून सुरुवात करण्यात आली.

यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम.एस. मुंडेवाडीकर, मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक माणिक कदम, ब्लड बँकेचे विद्यमान अध्यक्ष वैभव राऊत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील व बंजारा समाजाचे युवा उद्योजक अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

रक्तदान हे श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य घेऊन वैद्यकीय क्षेत्रात महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेची सोलापूरकरांच्या आरोग्य सेवेत गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे. दरवर्षी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. ग्रामीण व शहरातील गरजू रुग्णाला अत्यंत माफक दरात ॲम्बुलन्स सेवा रुजू करत आहे याचा लाभ घ्यावा असे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी आवाहन केले आहे.

याप्रसंगी ब्लड बँकेचे संचालक नागार्जुन जिंकले, सोमनाथ बिराजदार, विशाल कोळी, शिवा तुप्पद, टेक्निकल सुपरवायझर अश्विनी मनसावाले, जनसंपर्क अधिकारी रोहित बगले, नागेश पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!