५०० टॉप कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळणार : प्रा.डॉ. संतोष कदम

सोलापूर : प्रतिनिधी
भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूर येथे युनियन बजेट २०२४-२५ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सन २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून संतोष भीमराव पाटील कॉलेज मंद्रूप येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष कदम लाभले.
चर्चा सत्राच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संतोष कदम यांचे स्वागत केले व आपल्या स्वागत पर भाषणात इन्स्टिट्यूटर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी म्हणून बजेट समजून घेणे का महत्त्वाचे आहे यावरही प्रकाश टाकला. प्रमुख वक्ते डॉ. संतोष कदम यांनी आपल्या भाषणामध्ये युनियन बजेट मधील विविध ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकला ज्यात केंद्र सरकारतर्फे सुशिक्षित तरुणांना देशातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये एक वर्षासाठी इंटर्नशिप दिली जाणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना तरुणांना पाच हजार रुपये स्टायफंड दिले जाणार आहे. लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत दिला जाणाऱ्या कर्जामध्ये वीस लाखापर्यंत ची भरी वाढ करण्यात आलेली आहे.
रोजगार व कौशल्य प्रशिक्षणासाठी पाच नवीन योजना जाहीर करण्यात आल्या असून त्यासाठी दोन लाख कोटी पर्यंतची भरीव तरतूद करण्यात आली. यावेळी त्यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी बळ देणारा असून जे शेतकरी नैसर्गिक शेती करू इच्छितात अशा शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. या अर्थसंकल्पामध्ये नवीन 12 इंटरनॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. चर्चासत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाशी निगडित विविध प्रश्न विचारले व प्रमुख वक्ते डॉ संतोष कदम यांनी त्यांचे निराकरण केले.
चर्चासत्राचे सूत्रसंचालन श्रुती पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन निकिता भोगडे यांनी केली. या चर्चासत्रास उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी एम.बी.ए विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी एम.सी.ए. विभाग प्रमुख डॉ.एम.के.पाटील, डॉ. शबनम माने तसेच शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थि उपस्थित होते.हे चर्चासत्र यशस्वी रित्या पार पडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. शिवगंगा मैंदर्गी यांनी काम पाहिले.