सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांची निर्दोष मुक्तता

सोलापूर : प्रतिनिधी

विवाहिता सना माजिद खान, वय – 25 वर्षे, रा. सोलापूर हिला माहेराहून पाच लाख रुपये व्यापारासाठी आणण्याची मागणी करुन त्या करिता तिला नवी मुंबई व सोलापूर येथे शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करुन तिचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आरोपी पती माजिद अ. रऊफ खान (वय – 32 वर्षे), सासरे अब्दुल रऊफ खान (वय – 61 वर्षे), सासू हुसेनबानू अ. रऊफ खान (वय – 59 वर्षे) आणि दीर इमाम अ. रऊफ खान (वय – 34 वर्षे) (सर्व रा. नवी मुंबई) या चौघांची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीगत अशी की, दि. 23 सप्टेंबर 2012 रोजी लग्न झाल्यानंतर पती माजिद खान याने पत्नी सना खान हिला नवी मुंबई येथे नांदण्यास नेले. परंतु काही दिवसांत वरील चार आरोपींनी फिर्यादी सना खान हिला व्यापारासाठी माहेराहून पाच लाख रूपये आणण्याची मागणी केली. ती रक्कम न आणल्याने तिचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर विवाहितेचा चुलत भाऊ अझर पठाण याचे घरी तडजोड करुन आरोपींनी सना खान हिला नांदण्यासाठी नवी मुंबई येथे नेले. परंतु पुन्हा तिला आरोपींनी पैशांच्या कारणावरुन शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करून हाकलून दिले. त्यानंतरही सना खान माहेरी सोलापूर येथे असतानाही तिला आरोपी माजिद खान याने 5 जानेवारी 2014, 6 एप्रिल 2014 आणि 13 एप्रिल 2014 रोजी सोलापूर येथे येऊन वेळोवेळी मारहाण केली व धमकी दिली वगैरे आशयाची फिर्याद विवाहिता सना खान हिने सदर बझार पोलीस ठाण्यात दि. 23 एप्रिल 2014 रोजी आरोपींविरुद्ध दिली होती. गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरिक्षक सीमा सुर्वे यांनी केला.

सदर प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले. परंतु आरोपींचे वकील श्री. अंदोरे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालया च्या निदर्शनास आणून केवळ मुलाचा ताबा मिळवण्याकरिता आरोपींना खोट्या गुन्ह्यात गुंतविले असल्याचा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात सर्व आरोपींतर्फे ॲड. अरविंद अंदोरे, ॲड. आल्हाद अंदोरे व ॲड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ॲड. अमर डोके यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!