जरांगे पाटील यांच्या सभा स्थळाची मराठा क्रांती मोर्चा आणि प्रशासनाच्या वतीने केली पाहणी

सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील हे 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत समाज बांधवांची मते जाणून घेत त्यांना गरजवंत मराठ्याचा लढा आणि प्रशासनामधील सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापुरात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांतता रॅली नंतर भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या सभा स्थळाची पाहणी मराठा क्रांती मोर्चा, पोलीस प्रशासन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे पोलिस उपायुक्त विजय कबाडे, नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्यक्ष पाहणी करत नकाशा पाहून दुचाकी, चार चाकी वाहनांची पार्किंग कुठे असावी या संदर्भात चर्चा केली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक श्रीकांत घाडगे, आनंद जाधव, बाळासाहेब गायकवाड, रवी मोहिते, तुकाराम मस्के, मोहन चोपडे, शेखर फंड, योगेश पवार, यांच्यासह पोलीस प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी महापालिका सर्व विभागाचे अधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयक उपस्थित होते.