“शिवतीर्थ जनतेच्या हक्काचे न्यायालय” वाघनखे चिन्ह, घरावरील नेमप्लेट राज ठाकरेंना भेट, कोणी दिली.?

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या वेगळ्या शैलीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत त्यांचे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मनसैनिकां सह अनेक पक्षाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
ज्या पद्धतीने राज ठाकरेंची शैली अनोखी आहे त्याच पद्धतीने त्यांचे मनसैनिक देखील अनोख्या शैलीने चर्चिले जातात. राज ठाकरे यांचे चाहते कट्टर मनसैनिक म्हणून सोलापूर शहरात सुप्रसिद्ध असणारे सत्तार सय्यद हे एक उदाहरण आहेत त्यांनीही आज राज ठाकरे यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत सोलापूरी स्टाईलने सत्कार करत अनोखी भेट दिली.
सत्तार सय्यद यांनी दिलेली भेट मात्र चर्चेचा विषय ठरली होती. राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान हे मनसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या लक्षात असणारे महत्त्वपूर्ण न्याय याच घरावर नेमप्लेट कसा असावा यासाठी सत्तार सय्यद यांनी “शिवतीर्थ जनतेच्या हक्काचे न्यायालय” वाघनखे चिन्ह असलेले नेम प्लेट तयार करून राज ठाकरे यांना भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वाघ नखे वापरली होती. नेम प्लेट रुपी वाघ नखे भेट देत आगामी विधानसभेसाठी याचा अर्थ कशा पद्धतीने निकेल याची चर्चा मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिली जात होती.