अमर कुलकर्णी व अभिषेक रंपुरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कामाची दिली माहिती, राज ठाकरे यांनी केले कौतुक

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवशी सोलापूर दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी राज ठाकरे यांचे सोलापुरात आगमन झाले रूपा भवानी चौक येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सोलापुरात भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी व जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे व मनसैनिक उपस्थीत होते.
शासकीय विश्रामगृह येथे आल्यानंतर मनसेच्या विविध विभागाच्या वतीने राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आपापल्या विभागाचे कामांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून राज ठाकरे यांचा सोलापुरात स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे व प्रसाद कुमठेकर व मनसैनिक उपस्थीत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कामाचा आढावा घेतला राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी आणि जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कामाची माहिती दिली विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात व विद्यापीठात करण्यात आलेले आंदोलन, विद्यार्थ्यांना मिळवून दिलेल्या न्याय, परीक्षा काळातील झालेला गोंधळ त्यावर घेतलेली मनसेची भूमिका, सदस्य नोंदणी, यासह सामाजिक कार्याची माहिती देखील राज ठाकरे यांना दिली यावर राज ठाकरे यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.