श्रावणी सोमवारनिमित्त सोलापुरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. श्रावणी सोमवार निमित्त राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषत: श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी मंदिर परिसरात भक्तीसागर उसळलेला असतो.
पहिल्या श्रावण सोमवार निमित्त सोलापुरात आज पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला सप्तरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनाला व्हावी यासाठी मंदिरात आल्याची भावना भाविकांनी बोलून दाखवली.
त्यामुळे दिवसाची सुरुवात सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनाला व्हावी यासाठी मंदिरात आल्याची भावना भाविकांनी बोलून दाखवली. त्यामुळे दिवसाची सुरुवात सिद्धरामेश्वर महाराजांच्या दर्शनाने व्हावी यासाठी मंदिरात आल्याची भावना भाविकांनी बोलून दाखवली. सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात एरव्हीही भाविकांची गर्दी असते श्रावण महिन्यात भाविकांची जास्त भर पडते. याची माहिती शिवकुमार सोमनाथ हब्बु (पुजारी) यांनी दिली.