सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
माजी महिला आमदार झाडबुके यांनी शरद पवारांना बांधली राखी, जुन्या आठवणींना दिला उजाळा

महाराष्ट्रातल्या करोडो स्वाभिमानी कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शरद पवारानी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जमेल तेंव्हा हातभार लावला. मराठी माणसाच्या कुटुंबाला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा नेहमीच प्रयत्न केला. अश्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ, आज पुन्हा आपल्या बहिणीला आठवणीने भेटायला बार्शीत आला होता. असा हा भाऊ देशातील प्रत्येक बहिणीला मिळावा, हीच आजची लोकभावना आहे.
माजी आमदार प्रभावती झाडबुके वय 90 यांनी खासदार शरदचंद्र पवार वय 84 यांना राखी बांधून कर्तव्य बजावले, यावेळी शरद पवार आणि माजी आमदार प्रभावती झाडबुके यांच्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.