सोलापूर

चिट्टे शिंदे भेट, चन्नविर चिट्टे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार.? बंद खोलीत कोणती झाली चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत सोलापूर शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. शहर उत्तर विधानसभा मध्यंतरी चर्चेचा विषय बनला होता तो म्हणजे, भाजपने ते चन्नविर चिट्टे यांच्या बॅनर मुळे, उत्तर विधानसभा मतदारसंघात “आमचं ठरलंय” असं म्हणत अनेक ठिकाणी बॅनर लागले होते. भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे सलग चार टर्म निवडून येत उत्तर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. बॅनर वरील चिट्टेच्या फोटो पाठीमागे विधानसभा आणि भाजपचं कमळाचे चिन्ह असल्याने सोलापूर शहरात उलट सुलट चर्चेला उधान सुरू झाले.

चन्नविर चिट्टे हे भाजप कडून शहर उत्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.? असतील तर त्यांनी पक्षाकडे अधिकृत मागणी का केली नाही.? बॅनर लावून त्यांना काय सांगायचे आहे.? यासह अनेक किंतू परंतु चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगल्या आहेत.

चिट्टे चा बोलवता खरा धनी कोण.? याचा शोध विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते घेत असून, शेवटी काय होणार मागील दोन टर्मला जे झाले तेच होणार. म्हणजे मागील दोन टर्म विधानसभेला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात अनेकांनी उघड आणि छुपे बंड केले. परंतु अखेरीस आपली तलवार म्यान करत मालकांचेच काम केले. याचे अनेक उदाहरण मालकांचे कार्यकर्ते बोलताना देतात.

आता राहिला प्रश्न तो चन्नविर चिट्टे यांच्या विधानसभा निवडणुकीचा, येणाऱ्या काळात भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार.? ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार.? अपक्ष उभारणार.? यावर कोणती चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्याशी केली असावी. अमोल शिंदे आणि चन्नविर चिट्टे यांच्यात बंद खोलीत नेमकी कोणती चर्चा झाली ते भाजपा मध्येच राहणार की मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार याचीही चर्चा शहर उत्तर मध्ये रंगल्याचे पहावयास मिळते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!