सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

भगवान नगर येथील नागरिक पित आहेत मैला मिश्रित पाणी, नागरिक त्रस्त प्रशासन सुस्त : नरसय्या आडम

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर पोलीस मुख्यालय शेजारी असलेली भगवान नगर झोपडपट्टीचे 2016 साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना अंतर्गत पुनर्वसन करून पक्की घरे लाभार्थ्यांना हस्तांतरीत करण्यात आले. परंतु याठिकाणी मलनिस्सारण व्यवस्था योग्य व अचूक पद्धतीने न केल्यामुळे पिण्याचे पाणी नळ जोडणी व ड्रेनिज यांचे मिश्रित होऊन गढून पाणी, ड्रेनिज याचे पाणी यात फरक दिसत नाही.

मलनिस्सारण व पाणी जलवाहिनी फुटल्याने रोगराई पसरली आहे. ज्या दिवशी पाणी सोडले जाते त्यावेळी संपूर्ण वस्तीत नदीला पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.यामुळे प्रत्येक घरात एक डेंग्यू, मलेरिया, हिवताप, हगवण, थंडी तापेचा रुग्ण आधळून येतो. याबाबत वारंवार विभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. हे अत्यंत गंभीर आहे. नागरिक त्रस्त आणि प्रशासन सुस्त असल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांनी केली.

भगवान नगर येथील नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी या शिष्टमंडळात ॲड.अनिल वासम, वंदना भिसे, योगेश मार्गम, अंबादास बिंगी, आनंद कळसकर, मल्लेशम अल्ली, प्रशांत म्याकल, रवि केंचुगुंडी आदींची रेणुका गुंडला, सरस्वती कमुर्ती, उपस्थिती होती.

यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी सादर समस्या बाबत आयुक्त यांनी थेट हस्तक्षेप करून भगवान नगर येथील ड्रेनिज तातडीने दुरुस्ती करून पिण्याचे पाणी जलवाहिनी व मलनिस्सारण वाहिनी या दोन स्वतंत्र लाईन करणे अत्यावश्यक आहे. कृपया नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व अनिवार्य समस्या आहे. वस्तुस्थिती लक्षात घेऊन तातडीने पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन नागरिकांच्या वतीने दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!