सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

Turnkey laundary Project ची उभारणी, पालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या पाठपुराव्याला आले यश

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत शहरातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 8 प्रसुतिगृहे,15 नागरी आरोग्य केंद्रे व 12 विविध दवाखाने कार्यरत आहेत. भविष्यात या दवाखान्यांची संख्या वाढणार आहे. प्रसुतीगृहांमधून 250 बेड्स उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी वापरलेले बेडशीट, पिलो कवर्स, डॉक्टर गाऊन, पेशंट गाऊन यांची दैनंदिन स्वच्छता करणे अतिशय आवश्यक असते.

आजवर हे काम प्रसूती गृहाच्या आयां मार्फत केले जात होते. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मनपा करिता जिल्हा वार्षिक योजना सन 2022/23 नाविन्य पूर्ण योजना अंतर्गत र रू.84,00,000 इतका निधी turnkey laundary project उभा करणेकामी प्राप्त झाला होता. सदर निधी प्राप्त करून घेण्यासाठी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

विहित मार्गाने सदर प्रकल्पाची यशस्वी उभारणी मनपा च्या मदर तेरेसा पोली क्लिनिक च्या आवारात कऱण्यात आली असून आज 14 ऑगस्ट 2024 रोजी त्याचा लोकार्पण सोहळा आयुक्त शीतल तेली उगले यांचे हस्ते पार पडला.

सदर प्रोजेक्ट मध्ये प्रत्येकी 30kg क्षमतेचे दोन washer, 30kg क्षमतेचे एक ड्रायर व फ्लॅट ironer म्हणजे इस्त्री याचा समावेश आहे. या laundry च्या माध्यमातून रुग्णांना दररोज धुतलेले तसेच इस्त्री केलेले निर्जंतुक चादरी, बेडशीट व इतर कपडे मिळणार आहेत. यासाठी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करण्यात आले असून स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.

याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त गिरीश पंडित, आरोग्याधिकारी डॉ राखी माने यांच्यासह वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!