रामवाडी भागात पाणीटंचाई, नागरिकांची पाण्यासाठी वन वन, नागरिकांच्या मदतीला धावले गणेश डोंगरे

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, उजनी धरण मायनस मध्ये गेल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले. पाच सहा दिवसाआड येणारे पाणी, तेही अवेळी, अपुऱ्या दाबाने येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याचा प्रत्यय रामवाडी भागात पाहावयास मिळाला.
रामवाडी भागात नागरिकांना पाणी मिळत नसल्याने घागर, हंडा घेऊन नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, मिळेल तेथून पाणी घेऊन आपल्या दैनंदिन गरजा भागवत आहेत. नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून काँग्रेसचे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे हे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. रामवाडी भागात आमदार प्राणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याचे टँकर नागरिकांसाठी महानगर पालिके कडून उपलब्ध करून दिले.
उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पंप चालु केलं की चिखल, गाळ अडकल्याने मोटर बंद होत आहे. त्यामुळे सोलापूर शहरास योग्य पाणी पोहचत नाही. आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रामवाडी भागात टँकरची सोय गणेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून महानगर पालिके कडून करण्यात आली. महापालिकेकडून वेळेत पाणी टँकर आले नाहीत तर स्वखर्चातून रामवाडी भागात पाणी टँकर मागवू अशी भावना देखील युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी व्यक्त केली. गणेश डोंगरे यांनी दाखवलेले सामाजिक भान अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.