श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळ वसंत विहार च्या वतीने शिवजन्मोत्सव २०२५ पाळणा सोहळा साजरा

सोलापूर : प्रतिनिधी
श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळ वसंत विहार च्या वतीने शिवजन्मोत्सव २०२५ निमित्त श्री गणेश व छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती प्रमुख पाहुणे अशोक कामटे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष योगेश कुंदुर व एस टी महामंडळ संचालिका वैजयंती भोसले, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख लहु गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच श्री राजे गणपती महिला मंडळा तर्फे दुपारी १२ वा पाळणा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून ढोल ताशाच्या गजरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना उपशहरप्रमुख सुरेश जगताप यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे उत्सव अध्यक्ष श्रीनाथ भोसले, शिवसेना विभाग प्रमुख महेश गवळी, उमाकांत सुपाते, राजेश पानकर, वैभव पाटील, आशुतोष माने, विशाल धंगेकर, मंगेश क्षीरसागर, विवेक रुपनर, तानाजी पाटील, उमेश रुईकर, दत्ता सुरवसे, नितीन पवार (मेजर), संतोष माळी (मेजर), राहुल परदेशी, प्रशांत गुंड, पारप्पा पोळ, बाळकृष्ण बेंडकाळे, शाहू मसाळ, वाघमोडे काका, ढेकळे काका,
कोळी काका, मल्लिनाथ चौगुले व असंख्य महिला सभासद स्वातीताई रुपनर, सुरेखा जगताप, पूजा परदेशी, रचना पाटील, वैशाली पाटील, निकिता पानकर, ज्योती मुदलियार, प्रतिभा पुंगलिया, अंजली पवार, रूपाली मिटकरी, प्रांजली कुलकर्णी, प्रमिला क्षीरसागर, चित्रा सुरवसे, संध्या भोसले, सुनिता पवार, दिपाली गुंड, वैष्णवी क्षीरसागर, वैष्णवी धंगेकर, आराध्या पानकर आदी मान्यवर उपस्थित होते.