मृत्यू नंतरही भोगावे लागतात नरक यातना, रत्न मंजिरी नगरातील समस्या मेल्यानंतरही संपेनात, चिखलात बांधावी लागतेय मरणाची तिरडी

सोलापूर : प्रतिनिधी
काल १५ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग 26 मधील रत्नमंजीरी नगरात मोठ्या प्रमाणात रस्ता नसल्यामुळे संपूर्ण नगर चिखलमय झाले होते. त्यातच तेथील रहिवाशी दादा शेखु गवळी यांचे निधन झाले.
परंतु घरा समोर डांबरी रोड नसल्यामुळे चिखलातच मयत विधी करावा लागतोय, त्यांची तिरडी चिखलातच बांधली जात होती. त्यावेळी तेथील नागरिक यांनी ही बाब माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्या नंतर त्यांनी लागलीच सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांना कळवूनही काहीच उपाययोजना होत नसल्या बद्दल नाराजी व्यक्त केली.
या घटने नंतर नागरिकांतून सोलापूर महानगर पालिका विषयी प्रचंड नाराजी निर्माण होत आहे. आयुक्त शितल तेली उगले यांनी या भागातील समस्या जाणून घेऊन तात्काळ येथील नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानिक नागरिक टॅक्स स्वरूपात महापालिकेला 100% टॅक्स भरूनही त्यांच्या नगरातील कामे होत नाहीत ही शोकांतिका आहे असे संतप्त झालेल्या नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
स्थानिक कामे तात्काळ व्हावीत अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांत समवेत उघड आंदोलन छडावे लागेल असा इशारा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांनी दिला.