उत्तरचे मंडल अधिकारी सुखदेव पाटील यांचा मस्तवालपणा जखमी बापूराव रणदिवे यांना न्याय मिळणार का.?
तक्रार मागे घेण्यासाठी पाटील याचा खटाटोप, फिर्यादी रणदिवे भूमिकेवर ठाम, न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा दिला इशारा

सोलापूर : प्रतिनिधी
शुक्रवारी गाडीची चावी न दिल्याने उत्तर चे मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून बापूराव रणदिवे यांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली होती. याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या घटनेचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसारित होताच मंडळ अधिकारी सुखदेव पाटील यांनी बापूराव रणदिवे यांनी त्यांच्या बाबत दिलेली तक्रार मागे घ्यावी म्हणून पदाचा गैरवापर करून रणदिवे यांच्या नाते वाईकांकडून दबाव आणत आहेत मात्र कुठलीही परिस्थितीत आपण तक्रार मागे न घेण्याचा निर्णय बापूराव रणदिवे यांनी घेतला आहे.
आपल्याला न्याय नाही मिळाला तर जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा बापूराव रणदिवे यांनी दिला आहे. याबाबत तहसीलदार निलेश पाटील यांच्याकडे माध्यमांनी चौकशी केली असता तहसीलदार निलेश पाटील यांनी ही या प्रकरणात बोलायचे टाळले आणि सारवा सारव केली. आता या प्रकरणात बापूराव रणदिवे यांना न्याय मिळतो का.? मंडळ अधिकारी सुखदेव पाटील व त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर गुन्हा दखल होणार का ? हे पाहणे ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
या घटनेची सखोल चौकशी होऊन सत्य सर्वांसमोर यावे. अशा अधिकाऱ्यांवर वेळीच आवर घातली गेली नाही तर मात्र येणारा काळ अधिक बिकट होईल सर्वसामान्यांना न्याय मिळणार का.? गोरगरिबांचा वाली कोणी आहे का.? असा सवाल सर्वसामान्यां मधून विचारला जात आहे. अधिकारीच जर असे वागू लागले तर विश्र्वास कोणावर ठेवायचा, पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि पिढीतला न्याय द्यावा हीच अपेक्षा सर्वसामान्यांमधून येत आहे.