सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

वळसंग पोलीस ठाणेची कामगिरी, 19 लाखांचा चोरीस गेलेला बल्कर 24 तासात जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

28 ऑगस्ट 2024 रोजी अपरात्री 01-30 वा. चे सुमारास अल्ट्राटेक कंपनीच्या कॉर्नरजवळ एका 19,00,000/- रूपयांचा बल्करला 4 अनोळखी इसमांनी दोन मोटारसायकल वरून थांबवून जबरीने बल्कर चोरून नेला होता. सदरबाबत बल्करचे चालक सत्यम माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाणेत 4 इसमांविरूध्द गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याची दखल घेवून वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांनी सदरची हकिकत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना कळविले त्यावर पोलीस अधीक्षक यांनी सविस्तर सुचना दिल्या. सुचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांचे मार्गदर्शनाखाली पथक नेमुण सदरचा बल्कर शोधण्यासाठी पथक तयार करून रवाना केले.

सदरचा बल्करच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी साक्षीदार व संशयित इसमांकडे तपास केला. तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे शास्त्री नगर, रायचुर राज्य कर्नाटक येथे जावून शोध घेवून बल्कर 24 तासाच्या आत जप्त केला आहे. सदर प्रकरणी आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे करीत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकणी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांचे मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले, पोलीस उपनिरीक्षक/ सागर पाटील, पोना/ संतोष चव्हाण, पोकॉ/ शंकर पाटील यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!