देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, धनगर आरक्षण प्रश्नी युवक आक्रमक

सोलापूर प्रतिनिधी
धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आणि इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या अनेक संघटना हे विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत धनगर समाजाच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत आहेत तरी देखील शासन दखल घेत नसल्याचे पाहून युवक आता रस्त्यावर उतरत आहेत याचंच उदाहरण आज सोलापूर विमानतळ येथे पाहावयास मिळाले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस हे सोलापूर विमानतळ येथे आल्यानंतर तेथून मंगळवेढा येथील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मजरेवाडी रोड मार्गावर धनगर आरक्षणाचे आंदोलन शेखर बंगाळे यांनी आपल्या अंगावर भंडारा ओतून घेत काळ्या रंगाचा झेंडा दाखवत देवेंद्र फडवणीस यांचा निषेध केला यावेळी त्याने विविध घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी त्याला तातडीने रस्त्याच्या मध्यभागावरून बाजूला नेत पोलिसांच्या गाडीत बसवले आणि पुढील कारवाईसाठी विजापूर नाका पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आले.