सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

देवेंद्र कोठे यांच्या रूपाने सोलापूरला मिळाले विकासाचे नेतृत्व : पेंटप्पा गड्डम

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते देवेंद्र कोठे यांचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरसाठी युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून चांगले नेतृत्व पुढे येत आहे. सामाजिक आणि राजकीय वारसा असल्याने देवेंद्र कोठे यांना येणाऱ्या काळात कष्टकरी कामगारांचा आशीर्वाद सोबत असेल असा आशावाद यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते, स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक देवेंद्र कोठे यांच्या वतीने विनयग्राम विकास बहुउद्देशीय संस्था संचलित विवेकानंद विद्यालय सोलापूर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी यंत्रमाग धारक अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बोलत होते.

 

याप्रसंगी देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, प्रभागाचे नगरसेवक काशिनाथ झाडबुके, कोटा विडी घरकुलचे माधवकुमार कोठा, श्रीनिवास पोतन, अरिहंत स्कूलचे अध्यक्ष अजय पोन्नम, सुधाकर चिट्याल,भिमाशंकर बिराजदार, राजू चलमट्टी, पोन्नम ताई, बोड्डू ताई, सौ. मोनिका देवेंद्र कोठे, संस्थेच्या संचालिका सौ. धनश्रीताई कोंड्याल, इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका वैशाली गोली, व मराठी मिडीयमच्या मुख्याध्यापिका सौ. ससाने मॅडम भाजपा सोशल मीडिया प्रमुख अभिषेक जनता, अंबादास सकीनाल, पवन यलदंडी, महिला पदाधिकारी सुशीला सातलगाव, शोभा भिंगी, प्रीती देवरमणी, सुनंदा खळके, कांता बनसोडे सर्व स्टाफ विद्यार्थी व परिसरातील पालक उपस्थित होते.

यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम पुढे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते देवेंद्र कोठे यांनी हाती घेतलेला 54 हजार वह्या वाटपाचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या आशीर्वादाने देवेंद्र कोठे सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत.

पूर्व भागातील अशिक्षित यंत्रमाग कामगार, विडी कामगार वर्गाच्या मुलांना वह्या वाटप केल्या जात आहेत खूपच चांगली गोष्ट आहे. या परिसरातील अनेक मुले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर कार्य करत आहेत.’

यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. भोसले सर व आभार प्रदर्शन संस्थेच्या संचालिका धनश्रीताई कोंड्याल यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल व विनायक कोंड्याल यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

देशात नरेंद्र, राज्यात आणि सोलापुरात देवेंद्र! 

सोलापूर महानगरपालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून युवा नेते देवेंद्र कोठे यांनी उत्तम कामगिरी केली आहे. आपल्या प्रभागासह शहरात इतरही परिसरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि सोलापुरात देवेंद्र कोठे असे समीकरण दिसून येत आहे, असेही यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष उद्योजक पेंटप्पा गड्डम यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!