श्री जगद्गुरु रेवणसिध्देश्वर यात्रा मोठ्या थाटामाटात संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री. शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचे गुरुवर्य श्री जगद्गुरु रेवणसिध्देश्वर यात्रा श्रावण महिन्याच्या चारही रविवारी होत असते शेवटच्या रविवारी पालखी व रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. रेवणसिध्देश्वरांचे मंदिर विजापूर रोड परिसरात असल्यामुळे या भागातील भाविक दर रविवारी मोठया प्रमाणात या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात. गुरु-शिष्याची आदर्श जोडी – सोलापुरातील नागरिकांना श्रावण मासात पहावयास मिळते. अतिशय – शिस्तप्रिय, व मोठ्या भक्तीभावाने या यात्रेचे आयोजन करण्यात येते.
रेवणसिध्देश्वर मंदिर काळ्या पाषाणात बांधले असून सुमारे ४०० ते ५०० वर्षापूर्वीचे आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक रविवारी चांदीच्या पालखीत श्री. रेवणसिध्देश्वरांची मूर्ती विराजित करुन सकाळी ९ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येते.
पालखीचा मार्ग चिद्रे वाडा जोडभावी पेठ, – जुना आडत बाजार, कुंभार वेस, मंगळवार पेठ पोलीस चौकी, मधला मारुती, गुरुभेट, सात रस्ता मार्गे विजापूर रोड येथील रेवणसिध्देश्वर मंदिरात येते. तसेच पालखीची मिरवणूक मंदिराच्या प्रांगणात येते. पालखीचे आगमन झाल्या नंतर त्या ठिकाणी दुपारी १२. ३० वाजता मंगल आरतीने मिरवणुकीची सांगता होते. त्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते.
पालखी रथोत्सव मिरवणूकीच्या
अग्रभागी सजवलेल्या बैलजोडयांचा ताफा असतो. विविध प्रकारचे वाद्यवृंद आणि शोभेची आतिषबाजी करीत पारंपारिक मार्गावरुन मिरवणूक मोठ्या वैभवात निघते व ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. ही परंपरा गेली दीडशे वर्षाहून अधिक काळापासून अखंडित चालत आहे असे जाणकार सांगतात.
या प्रसंगी महादेव चाकोते, प्रकाश वाले, ॲड निलेश ठोकडे, प्रकाश बिराजदार, यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवानंद ख्याडे, सुभाष जक्कापुरे, मल्लिनाथ राचेटी, सिद्धेश्वर दुलंगे, राजेंद्र इंडे, गंगाधर यादवड, गिरमलप्पा हिंगमिरे, शिवानंद ख्याडे, संतोष घटोळे, चंद्रकांत मुंडे, सागर अतनूरे, मल्लिनाथ सोलापुरे, आशिष दुलंगे, विकी चाकोते, चेतन आवटे, सतीश पारेली, अक्षय दुलंगे, मनोज पाटील, बाळासाहेब वाघमोडे, बाबुराव अतनूरे, भागेश ख्याडे, चिदानंद बगले यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी उत्सव अध्यक्ष रोहित बिद्री, ऋषिकेश हिंगमिरे, मल्लिनाथ कलशेट्टी, शुभम धनशेट्टी, सुरज कोरे, अभिजीत तांडुरे, बंटी वारद, मंथन चिडगुंपी, बसवराज जाभा, श्रीशैल जक्कापूरे, विरेश वारद, मल्लिनाथ कलशेट्टी, सचिन तुगावे, मंथन चिडगुंपी, अभिजित स्वामी, सुरेश धनश्री, नागराज बिराजदार, नागेश ख्याडे, रितेश भोसले, अभिजित तांडूरे, शुभम हरके, शुभम धनशेट्टी, शुभम वडतिले, करण वडतिले, अक्षय वडतिले,आदिनी परिश्रम घेतले.