ॲड. प्रदिपसिंग राजपूत हे पुणे पोलीसांचे वतीने मुंबई उच्च न्यायालय व सत्र न्यायालय येथे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदिपसिंग राजपूत यांची पुणे पोलीसांचे वतीने काही खटल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय व सत्र न्यायालय येथे विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्या बाबतची अधिसुचना विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडून काढण्यात आली आहे.
सदर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंग राजपूत हे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे गेल्या सहा वर्षांपासून कार्य करीत असून त्यांनी त्यांचे कालावधीत आजपर्यंत जवळपास १०९ गुन्हेगारांना जन्मठेप तर दोन आरोपींना फाशीची शिक्षा लावण्यात यश मिळविले आहे.
तसेच इतर अनेक छोट्या-मोठ्या गुन्हयांमध्ये १ वर्षे ते २५ वर्षांपर्यत शिक्षा घेवून अनेक गंभीर स्वरुपाचे व महत्तवाचे गुन्हयांतील आरोपीचे जामिन अर्ज नामंजूर करुन घेण्यात यश मिळविले आहे. महाराष्ट्र शासनाने सदर गोष्टींची दखल घेवून त्यांची यापूर्वी एका खटल्यात लातूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती.
आता पुणे पोलीसांचे विनंती वरुन पुणे पोलीसांचे काही खटले मुंबई उच्च न्यायालय व पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे चालविण्याकरीता विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी नेमणूक केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत सदरची नविन जबाबदारी पार पाडणार आहेत. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.