सोलापूर बार असोसिएशन जिल्हास्तरीय वकिलांची बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ – २५ निमित्त प्रथमच जिल्हास्तरीय वकिलांची बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. बार असोसिएशन हॉल, सोलापूर जिल्हा न्यायालय येथे या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पी. एम. पाटील आणि जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी बुद्धिबळ पटावरील चाल खेळून केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेश देवर्षी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विनायक रेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे यांनी प्रस्तावना मांडला. या स्पर्धेत पुरुष गटात ५२ वकीलांनी, महिला गटात ८ आणि त्यांच्या (पाल्याच्या) मुलांच्या गटात १० असे एकूण ७० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. उद्घाटन प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. पी. एम. पाटील यांनी बुद्धिबळ हा खेळ बुद्धिजीवी असल्याने वकिलांना आणि न्यायाधीशांना याचा खूप फायदा होतो, बुद्धिबळामुळे एकग्रता, संयम यात वाढ होते, याचा फायदा एखाद्या केस मध्ये होतो असे नमूद करत सर्वांनी दररोज बुद्धिबळाचा एखादा डाव खेळावा असे आवाहन केले, तसेच सोलापूरच्या इतिहासात प्रथमच वकील आणि न्यायाधीशांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी यांचे कौतुक करून त्यांचे धन्यवाद केले.
बुद्धिबळ स्पर्धेचे निकाल
पुरुष गट – प्रथम क्रमांक ॲड. किरण अंकुशराव द्वितीय क्रमांक ॲड. फिरोज शेख, तृतीय क्रमांक ॲड. प्रथमेश शिंदे, उत्तेजनार्थ न्यायाधीश श्रीमंत विनायक रेडकर आणि उत्तेजनार्थ ॲड. प्रकाश अभंगे
महिला गट – प्रथम क्रमांक ॲड. शिवानी करवा, द्वितीय क्रमांक ॲड. पूजा खांडेकर, तृतीय क्रमांक ॲड. वनिता कडदास, उत्तेजनार्थ ॲड. सुनयना थोरात आणि उत्तेजनार्थ सौ. लीना गजेंद्र खरात.
मुलांचा गट – कारुण्य विवेक शाक्य, यश मनोज पामुल आणि जयवीर जयदीप मोहिते यांनी विजय मिळविला.
सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असो अध्यक्ष ॲड. अमित व्हि. आळंगे, उपाध्यक्ष-ॲड. व्ही. पी. शिंदे, सचिव ॲड. मनोज नागेश पामूल, सहसचिवा ॲड. निदा अनिस सैफन, खजिनदार ॲड. विनयकुमार सि. कटारे सह सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. व्ही. एस. आळंगे, ॲड. प्रकाश कुलकर्णी, ॲड. अभिजीत देवधर व इतर बहुसंख्य विधिज्ञ उपस्थित होते. स्पर्धा पर पाडण्यासाठी प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, राज्य पंच श्री विजय पंगुडवाले आणि बार असोसिएशनचे सदस्य यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड. मनोज पामुल व आभार प्रदर्शन ॲड. निदा सैफन यांनी मानले.