राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रातून राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा मिळते : भारत जाधव

सोलापूर : प्रतिनिधी
लोककल्याणकारी आणि व्यापक असे स्वराज्य निर्मितीचे ध्येय आणि प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांनी त्यांच्या वीरतेचा, कणखर नेतृत्वाचा आणि अचूक निर्णयक्षमतेचा परिचय सर्वांना दिला, त्यामुळे एक आदर्श हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. तसेच विद्वत्ता, त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी युवाशक्तीला प्रेरणा दिली, असे मत माजी अध्यक्ष भारत जाधव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे अध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शन आणि प्रयत्नातून सोलापुरातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत असलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ, गुच्छ, मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, शहर युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, रेखाताई सपाटे, सुप्रिया लोमटे, सारिका नारायणकर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सुर्यकांत शेरखाने, खजिनदार सुनीलकुमार इंगळे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे, वैद्यकीय विभाग प्रदेश सरचिटणीस प्रा. राहुल बोळकोटे, शहर उपाध्यक्ष व्ही.डी.गायकवाड, बळीराम एडके, सोशल मिडिया शहराध्यक्ष शक्ती कटकधोंड, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू, युवक उपाध्यक्ष मुसा अत्तार, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा, बिरप्पा बंडगर, सुर्यकांत शिवशरण, सोपान खांडेकर, प्रमोद भवाळ, संदीप साळुंखे, नूर नदाफ आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खालिल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. अस्मिता बालगावकर (सामाजिक कार्यकर्त्या) डॉ. पल्लवी भांगे (आहार तज्ञ), सौ. सुजाता यादवाड (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सोलापूर शहर), सौ. रेश्मा मोरे (महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सोलापूर शहर), सौ. पुष्पा नायर (मुख्याध्यापिका), सौ. विजयालक्ष्मी सिंदगी (निवृत्त मुख्याध्यापिका – सो. म. पा.), सौ. सोनाली कासार (कनिष्ठ लिपिक – जिल्हा उपनिबंधक, सोलापूर), सौ. सरिता लोखंडे (परिचारिका, सो. म. पा आरोग्य केंद्र, सोलापूर), सौ. शुभांगी लिंगराज (सामाजिक कार्यकर्त्या), सौ. माया गायकवाड (निवृत्त परिचारिका), सौ. आरती गांधी (सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका), सौ. दर्शनी कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या)