दक्षिण मध्ये राठोड-वैद्य जोडीची हवा, सामाजिक उपक्रमांचा लावला धडाका, 2 हजार छत्र्या कष्टकऱ्यांना देऊन जोपासली सामाजिक बांधिलकी

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास या ब्रीद वाक्याखाली युवराज राठोड आणि सोमेश वैद्य हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशन या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवत गोरगरीब कष्टकरी यांना राठोड-वैद्य जोडी मदत करत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांना पर्याय म्हणून आता राठोड-वैद्य जोडीकडे पाहिले जात आहे. एकंदरीतच दक्षिण सोलापूर तालुक्यातील सात ते आठ जण एकत्र येत एक वेगळे आघाडी स्थापन करून दक्षिणचा विकास करण्याचा मनसुबा त्यांनी मध्यंतरी व्यक्त केला होता.
सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून राठोड-वैद्य जोडीने कष्टकरी आणि उन्हात राबणाऱ्या गोरगरिबांना 2 हजार छत्री भेट देऊन त्यांना मायेची सावली देण्याचे काम केलं आहे. कष्टकरी, महिला गोरगरीब यांनी उन्हामध्ये फळभाजी विक्री, अनेक छोटे-मोठे व्यवसाय विक्री करणारे मायेच्या सावलीने आनंदित झाल्याचे पहावयास मिळाले. अनेक महिलांनी राठोड-वैद्य यांचे मनापासून आभार व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एकंदरीतच राठोड-वैद्य जोडीने दक्षिण सोलापूर तालुक्यात लावलेल्या सामाजिक उपक्रमांचा धडाका अनेकांना धडकी बसवनारा असून अनेकांनी यांच्या सामाजिक उपक्रमाची धास्ती घेतल्याचं बोललं जातंय.