
सोलापूर : प्रतिनिधी
दरवर्षी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या निवासस्थानी गणरायाचे मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत करण्यात येते. याही वर्षी गणरायाचे मोठ्या आनंदात स्वागत करून धार्मिक विधी व पद्धतीने पूजन करण्यात आले.
यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे उज्वलाताई शिंदे यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
गणरायाची आम्ही मोठ्या उत्साहात आनंदात स्वागत केले, यावर्षी सोलापूरकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. गणराया चरणी कृतज्ञतेची भावना आम्ही नेहमी व्यक्त करतो. सोलापूरचे सर्व प्रश्न संकट नष्ट होत ही प्रार्थना गणराया चरणी केल्याचं मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.