सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सचिन चव्हाण यांनी परिवर्तन आघाडीत सामील व्हावे : युवराज राठोड

सोलापूर : प्रतिनिधी
सचिन चव्हाण यांची बंजारा समाज तांडा सुधार समृध्दी योजना अशासकीय सदस्य पदी निवड आणि वाढदिवसा निमित्त सोनाई फाउंडेशन आणि दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी सोनाई फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, युवराज राठोड, शिंदे गट सेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णप्पा सतूबर, मागास समाज सेवा मंडळाचे सचिव किरण चव्हाण, नितीन चव्हाण,
सनी राठोड, अमोगसिध्द गायकवाड, प्रशांत रणदिवे, जितेश चव्हाण यांच्यासह आदींनी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दक्षिण सोलापूर परिवर्तन आघाडीत सामील होण्याचे साकडेही चव्हाण यांना घालण्यात आले.