पत्रा तालीम च्या लेझीमची मुंबई पुणे नागपूर मध्ये चर्चा, शेकडो युवकांनी लयबद्ध लेझीम सादर करत सोलापूरकरांचे जिंकले मन

सोलापूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रा तालीम गणेश उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येतो, याची प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रभर सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. खऱ्या अर्थाने सोलापुरातील मानाचा पणजोबा गणपती म्हणून पत्रा तालमीच्या गणपतीला मानाचे स्थान आहे.
प्रारंभी गणरायाचे पूजन पत्रा तालमीचे खलिफा दत्तात्रय कोलारकर, शिवाजीराव घाडगे गुरुजी, माजी उपमहापौर पद्माकर काळे, महेश गादेकर, राजन जाधव, श्रीकांत घाडगे, नागनाथ बन्ने, बापू जाधव, राजाराम दुधाळ, मनोज गादेकर, गणेश शेळके, सचिन शिंदे, यांच्यासह ज्येष्ठांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
पत्रा तालीम गणेश उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात, गणरायाच्या आगमना निमित्त काढण्यात आलेली लेझीम मिरवणूक पाहण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटकातील नागरिक देखील दाखल होतात. अनेक वर्षाची परंपरा लयबद्ध लेझीमचे सादरीकरण, युवकांच संघटन, पैलवानांची फळी यामुळे पत्रा तालीम ची वेगळी ओळख सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात आहे.
यंदाच्या वर्षी गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या लेझीम मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर याची चर्चा मुंबई पुणे आणि नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात रंगल्याचे पहावयास मिळालं.
पत्रा तालीम गणेशोत्सव मंडळाचे नूतन अध्यक्ष पै नवनाथ बन्ने, पिंटू चव्हाण, बाबूभाई बनसोडे, पेजर चव्हाण, धनराज शिंदे, आनंद कोलारकर, पिंटू इरशेट्टी, पै अभिजीत दुधाळ, प्रकाश काळे, सुरज पाटील, विजय कांबळे, सुहास चाबुकस्वार, निलेश शिंदे, किशोर गादेकर, तम्मा गुडुर, यांच्यासह पत्रा तालीम युवक मंडळाच्या सदस्यांनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.