देवेंद्र कोठे यांची शिष्टाई कामाला, महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक, त्वरित कार्यवाही करण्याचा दिला शब्द

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भरातून प्रत्येक जिल्ह्यातील पद्मशाली समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची सागर बंगल्यावर महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदरील बैठकीत महाराष्ट्रभरातून आलेल्या समाजातील प्रशासकीय, राजकीय तसेच उद्योग व्यवसायातील अभ्यासू व्यक्तींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपल्या समस्या तसेच मागण्या मांडल्या, शिक्षण, आरक्षण, उद्योग-व्यवसाय, तसेच समाजातील अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
सोलापूरकरांच्या वतीने देवेंद्र कोठे यांनी कॉटन सुता पासून बनवलेल्या हारावर देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिमा असलेला हार महापालिका माजी आयुक्ता चंद्रकांत गुढेवार तसेच पद्मशाली समाजाची जेष्ठ मान्यवर एडवोकेट रामदास सब्बन यांच्या हस्ते घालून सत्कार केला.
सोलापुरातील यंत्रमागावर विणलेले चादर भेट म्हणून दिले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले महाराष्ट्रातील ठळक कार्य (मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग) विणकामातून प्रतिबिंबित केलेली चादर पाहून देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील विणकारांचे कौतुक केले.
बैठकीत अशोक इंदापुरे यांनी सोलापुरातील पद्मशाली बांधवांच्या वतीने एसबीसी विषयी, यंत्रमाग उद्योग, मार्कंडेय सोलापूर रुग्णालयास क ऐवजी अ वर्ग मान्यता मिळावी, महात्मा फुले आरोग्य योजना सुरू करून रेडीमेड गारमेंट व्यवसायास शासनाच्या काही ऑर्डर कायम स्वरूपी मिळवून देण्याबाबत मागण्या मांडल्या, त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा त्वरित कार्यवाही करण्याचे शब्द दिले.