वसंत विहार भागातील श्रीराजे गणपती संस्कृतिक मंडळाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी
वसंत विहार परिसरातील श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा तसेच दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ काल संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर संपन्न झाला. या बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा बक्षीस आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प सुधाकर महाराज इंगळे, धर्मादाय आयुक्तालयाचे अधीक्षक सत्यजीत कुमठेकर, एसटी महामंडळ बँकेच्या माजी संचालिका सौ. वैजयंतीताई भोसले, युवासेना सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहुजी गायकवाड, श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा जगताप, युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हाप्रमुख तुषार आवताडे यांची प्रमुख उपस्थित होती.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा जगताप यांनी केले. यामध्ये त्यांनी आजवर मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच स्पर्धांची माहिती दिली. प्रमुख अतिथी कुमठेकर यांनी मंडळाचे वसंत विहार भागामध्ये संस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. सुधाकर महाराज महाराज इंगळे यांनी उपस्थितांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगत गणेशोत्सवानिमित्त लहान मुलांमध्ये शाळकरी वयापासून शिक्षणासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कार करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले सोबतच राजे गणपती सांस्कृतिक मंडळाने आजवर राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत सुरेश मामा जगताप यांच्या नेतृत्वामुळे मंडळाचा वसंत विहार भागातील नावलौकिक या भागाच्या सामाजिक विकासासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.
संगीत खुर्ची, लिंबू चमचा,बादलीत बॉल टाकने, पोत्यात उडी यासोबतच अनेक स्पर्धांचे आयोजन राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उत्सव अध्यक्ष श्रीनाथ भोसले, उपाध्यक्ष आशुतोष माने वैभव पाटील, खजिनदार राजेश पानकर, मंगेश शिरसागर, विवेक रुपनर, विजय मोटे, राहुल परदेशी, बाळासाहेब कुलकर्णी, विशाल दंगेकर, तानाजी पाटील, उमेश रुईकर, शिवराम मेटकरी, दत्ता सुरवसे, बाळासाहेब बेंडकाळे, पाराप्पा पोळ यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.