
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचे युवा वॉरियर गुरुभाई कवडे आणि त्यांचे बंधू पश्चिम महाराष्ट्र भाजप विद्यार्थी विभाग सहसंयोजक शिवा कवडे यांनी होम टू होम, कॉर्नर बैठक, सभा याद्वारे प्रचार केला आहे.
देव देश धर्मासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुनश्च एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन कवडे बंधूंनी प्रभाग क्रमांक 15 मध्ये केले. प्रभाग क्रमांक 15 हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या प्रभागात काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि चार नगरसेवक असून या भागात आगामी काळात भाजपचा बालेकिल्ला होईल आणि या प्रभागातून जास्तीत जास्त लिड भाजप उमेदवार राम सातपुते ना देणार असा विश्वास युवा वॉरियर गुरुभाई कवडे यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रकाश मडिवाळ, आनंद सुरवसे, सागर सांगवे, ओंकार खुळे, राजेश गायकवाड, दिलीप कनकधार, ऋषिकेश भोसले, विजय दिवटे, अक्षय सूर्यवंशी, शुभम गरड, ओंकार पाटील, दीपक बोतल, सुहास भोसले, अतुल खांडेकर, आकाश रामपुरे, आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.