धर्मवीर २ चा फर्स्ट डे फर्स्ट शो मोफत, मनिष काळजे यांचा सामाजिक उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा ‘धर्मवीर २’ चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे. सोलापूरातील चित्रपट रसिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. उद्या उमा मंदिर चित्रपटगृह येथे दुपारी १२ वाजता होणारा ‘धर्मवीर २’ चित्रपट पूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्या प्रयत्नातून प्रायोजित करण्यात आला आहे.
धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल लहान पणा पासूनच आदर वाटत आला आहे. त्यांचे हिंदुत्वनिष्ठ विचार, परखड बाणा आणि संघर्षमय जीवन शिवसैनिकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्या कार्याचं ऋण फेडण्याचा आणि नव्या पिढीला त्यांच्या जीवनाची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे, असे मनिष काळजे यांनी सांगितले.
शिवसैनिकांसाठी हा एक खास क्षण असून, सर्वांना या चित्रपटाचा आनंद लुटण्याची सुवर्ण संधी आहे.