क्राईममहाराष्ट्रशेतीसामाजिकसोलापूर
भावकीचा वाद जीवावर उठला, आई अन् मुलाला संपवलं, वडील गंभीर जखमी

सोलापूर : प्रतिनिधी (बार्शी)
बार्शी तालुक्यातील भोयरे गावात पाटील भावकीत वाद झाला. हा वाद शेतीच्या वाटेच्या वादातून झाल्याचं समजते. किसन पाटील, सागर पाटील आणि सिंधू पाटील हे कामानिमित्त शेतात गेले होते. शेतातून घराकडे परत येत असताना, त्यांच्या घरासमोर हल्ला घडला. पुतण्यानेच धारदार हत्यारानं, चुलत्याचा मुलगा आणि त्याची आई अशा दोघांना ठार केले. यात किसन पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
घटना घडल्यानंतर प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, बार्शी शहरचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात सौदागर दादा पाटील याच्यासह अन्य एकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक अजित पाटील यांनी दिली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.